को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटय़ांमधील सदनिकाधारकांकडून प्रलंबित असलेली
थकबाकी वसूल करणे म्हणजे डोकेदुखीचे काम आहे. हे करताना समोर येणाऱ्या
समस्या व उपाय, यांविषयी..
कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटय़ांमधील सदनिकाधारकांकडून प्रलंबित असलेली
थकबाकी वसूल करणे, ही आजकाल खूप मोठी कटकटीची बाब बनली आहे. 'नको असलेले
अवघड जागेचे दुखणे' अशा प्रकारची अवस्था सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व
कमिटी मेंबर्सची झालेली दिसते. एकोप्याने संबंध टिकवून ठेवायचे म्हटले तर
पूर्ण वसुली होत नाही.