Sunday, December 21, 2014

गृहनिर्माण सोसायटी थकबाकी : समस्या व उपाय

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटय़ांमधील सदनिकाधारकांकडून प्रलंबित असलेली थकबाकी वसूल करणे म्हणजे डोकेदुखीचे काम आहे. हे करताना समोर येणाऱ्या समस्या व उपाय, यांविषयी..
कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटय़ांमधील सदनिकाधारकांकडून प्रलंबित असलेली थकबाकी वसूल करणे, ही आजकाल खूप मोठी कटकटीची बाब बनली आहे. 'नको असलेले अवघड जागेचे दुखणे' अशा प्रकारची अवस्था सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व कमिटी मेंबर्सची झालेली दिसते. एकोप्याने संबंध टिकवून ठेवायचे म्हटले तर पूर्ण वसुली होत नाही.

वास्तुप्रतिसाद : थकबाकीबाबत सभेत मंजुरी हवी

गृहनिर्माण सोसायटी थकबाकी : समस्या व उपाय हा 'वास्तुरंग'(२२ नोव्हेंबर) मध्ये प्रसिद्ध झालेला सतीश ओक यांचा लेख वाचला. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या ताळेबंदात कोणत्या सभासदाकडून संस्थेला किती येणे बाकी आहे याचा लेखा परीक्षणाचा आढावा घेतला जातो. प्रत्येक वर्षांची मार्च अखेरची थकबाकी निर्देशित केली जाते हे लेखकाचे म्हणणे मान्य आहे, परंतु समितीने जाहीर केलेली थकबाकी खरी की खोटी हे कोणी ठरवायचे?

घर खरेदीत बिल्डरांची (छुपी) वाटमारी

नवीन घर खरेदी व्यवहारात विकासकाकडून  ग्राहकराजाच्या कष्टाच्या पैशाची छुपी वाटमारी सुरू असते, त्याविषयी..
नवीन घर खरेदी व्यवहारात घराचे काम विनासायास करून घेण्यासाठी विकासक ग्राहकाकडून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विविध कारणास्तव अतिरिक्त पैशाची मागणी करीत असतो. गेली अनेक वर्षे  'ग्राहकराजा' अगदी निमूटपणे विकासकाची मागणी पुरवीत आला आहे. 'ग्राहकराजा जागा हो' किंवा तत्सम संदेश देणाऱ्या जाहिरातीप्रमाणे, मनाला न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करायचा म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.

कामोठे : कालचे गाव..आजची नियोजित वसाहत!

कामोठे गावाने आपली 'गाव' ही ओळख मागे टाकली आहे. अनेक विकास प्रकल्पांमुळे या गावाने 'आजची नियोजित वसाहत' अशी नवीन ओळख निर्माण केली आहे.
हार्बर रेल्वेमार्गावरील मानसरोवर व खांदेश्वर ही दोन स्थानके कामोठे वसाहतीला लाभल्याने मुंबईकरांनी राहण्यास आपली पसंती कामोठेला दिली आहे. दोन लाख लोकवस्तींच्या कामोठे वसाहतीमध्ये लवकरच सरकारी बससेवा सुरू होणार आहे. त्यामुळे येथील तीन आसनी रिक्षांव्यतिरिक्त अन्य पर्याय येथील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. खांदेश्वर रेल्वे स्थानक ते दुधे कॉर्नरमार्गे ही बस वसाहतीमधील मुख्य चौकांच्या मार्गावरून शीव-पनवेल महामार्गालगत मानसरोवर रेल्वे स्थानक या पल्यावर रिंगरूट पद्धतीने धावणार आहे.

तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीस प्रारंभ

नवी मुंबईच्या निर्मितीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून सिडको, बेलापूरजवळ रायगड जिल्ह्य़ात तिसऱ्या मुंबईची मुहूर्तमेढ लवकरच रोवणार आहे. राज्य शासनाने सिडकोकडे दिलेल्या २७० गावांजवळच्या जमिनीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून २४ गावांचा विकास आराखडा तयार केला जात आहे. येथील शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमिनी दिल्यास सिडको एक आगळी वेगळी इको सिटी बनविण्याचा विचार करीत असून नवी मुंबई निर्मितीत झालेल्या चुका या ठिकाणी टाळल्या जाणार आहे.

Saturday, December 20, 2014

नवीन घर घेण्यापूर्वी...


सध्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्यामुळे एकरकमी घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागतो. अधिक कर्ज काढून नंतर हप्ता भरण्यासाठी उभी हयात घालविण्यापेक्षा स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हितावह आहे.


भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात जाणे, हे प्रत्येक उत्पन्नगटातील नोकरदाराचे अथवा कुटुंबाचे स्वप्न असते. गेल्या काही वर्षांमध्ये गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थाचे जाळे मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे.
बँका, पतसंस्था आदी संस्था गृहकर्जे वितरीत करण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरीही कर्जाचे ओझे घेऊन दीर्घकाळ वाटचाल करणे अशक्यप्राय होऊन जाते. मात्र, तरीही हक्काच्या घराच्या हव्यासापायी ही सर्व आव्हाने मागचापुढचा विचार न करता स्वीकारली जातात आणि कर्जाच्या ओझ्याखाली संबंधिताची फरफट होते.