Sunday, December 21, 2014

गृहनिर्माण सोसायटी थकबाकी : समस्या व उपाय

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटय़ांमधील सदनिकाधारकांकडून प्रलंबित असलेली थकबाकी वसूल करणे म्हणजे डोकेदुखीचे काम आहे. हे करताना समोर येणाऱ्या समस्या व उपाय, यांविषयी..
कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटय़ांमधील सदनिकाधारकांकडून प्रलंबित असलेली थकबाकी वसूल करणे, ही आजकाल खूप मोठी कटकटीची बाब बनली आहे. 'नको असलेले अवघड जागेचे दुखणे' अशा प्रकारची अवस्था सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व कमिटी मेंबर्सची झालेली दिसते. एकोप्याने संबंध टिकवून ठेवायचे म्हटले तर पूर्ण वसुली होत नाही.
किंवा काही सदनिकाधारक सोसायटीचे देणे आहे ते केव्हाही देऊ म्हणून मुद्दाम वेळकाढूपणा करतात. देय बिले थांबवणे यात एक प्रकारचा आसुरी आनंद उपभोगणे अशी हीनवृत्तीही त्यात आढळते. सांपत्तिक मान, इतरांना तुच्छ लेखणे किंवा दुसरे कसे गोत्यात येतील असे विचार मनात बाळगत बाहेरून मात्र साळसूदपणाचा आव आणण्यात काही सभासद 'बनेलगिरी' करत असतात.
प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या (इं'ंल्लूी २ँी३) ताळेबंदात कोणत्या सभासदाकडून संस्थेला किती येणे बाकी आहे याचा लेखा परीक्षणात (ऑडिट) आढावा घेतला जातो. प्रत्येक वर्षांची मार्च अखेरीची थकबाकी निर्देशित केली जाते. परंतु काही वेळा देणेकऱ्यांचे नको नको ते आरोप पदरी पाडण्यापेक्षा थकबाकी वसुलीबाबत मौन बाळगणे हे कार्यकारिणीस भाग पाडते.

मालमत्तेवरील कर, पाणीपट्टी, सामायिक वीजखर्च, इमारत दुरुस्ती व देखभाल खर्च, उद्वाहन (लिफ्ट) चालविण्याच्या खर्चासहीत त्यांच्या देखभालीचा खर्च, सिंकिंग फंड वर्गणी, संस्था शुल्क, विम्याचा हप्ता, भुईभाडे, बिगर शेतीकर, परवाना फी, वाहने उभी करण्याच्या जागेचे शुल्क अशा अनेक बाबी वसुलीशी संबंधित आहेत. सभासदांनी वेळेवर रकमा न भरल्यामुळे गृहनिर्माण संस्थेच्या देय रकमांवर याचा परिणाम होताना दिसतो. सरकारने कायदे मात्र केले, परंतु त्यातल्या उणिवा किंवा दोष कार्यकारिणीला सहन करावे लागतात.

थकबाकीदार सभासदांकडून वसुलीची रक्कम येणे ही क्रमप्राप्त बाब असली तरी कायद्याचे अधिकार बोथट झालेले दिसतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१-६२(्र) प्रमाणे सोसायटीचा ताळेबंद झाल्यानंतर ४५ दिवसांत सेक्रेटरी, चेअरमन वा अन्य जबाबदार व्यक्ती यांनी सोसायटीचे हिशोब लेखा परीक्षक व सबरजिस्ट्रारकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. परंतु यात महत्त्वाचा दोष असा, की लेखा परीक्षक आपले मत नोंदवितो व केलेला कायदा कागदोपत्री तसाच पुढे रेंगाळत चालतो! याचा परिणाम असा होतो की सभासदांची रखडलेली वसुली तशीच राहते. सदनिकाधारकाने वेळेत देणी देणे आवश्यक व क्रमप्राप्त असले तरी काही सभासद मुद्दाम असहकार स्वीकारतात. देणी वेळेवर देत नाहीत. अर्थात, कोणत्याही सदस्याचे तुंबलेले बाकी येणे सोसायटीला तसे माफ करता येत नाही, पण याचा एकूण परिणाम सोसायटीच्या कामकाजावर होताना दिसतो.
सहकारी गृहनिर्माण संस्थेचे आर्थिक उत्पन्न मंदावणे, देणी भागवताना संबंधितांचे नाकी नऊ येणे वा अन्य अडचणींना तोंड देणे भाग पडते.

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आपली अल्लल्ल४ं' ॅील्ली१ं' टी३्रल्लॠ वर्षांतून दोन वेळा लावावी. दुसरी मीटिंग सर्व सदनिकाधारकांनी मेन्टेनन्सची बिले किंवा त्यांची मागील रखडलेली थकबाकी वा इतर वसुलीची जाणीव व माहिती करून द्यावी. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात फेब्रुवारी व मार्च महिन्याची बिले सर्व सभासदांना मिळतील अशा तऱ्हेने वितरित करावी व महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०च्या कलम १०१ अंतर्गत काही संस्थांची सभासदांकडे असणारी देय रकमेची वसुली ही जमीन महसुलाची बाकी आहे अशी तरतूद आहे, त्यानुसार वसुली करणे आवश्यक आहे.

कायद्यातील उणिवा दाखवताना सरकारने हा केलेला कायदा पुन्हा तपासून पाहावा व त्यात बदल करावेत. लेखा परीक्षकाकडे जेव्हा वसुलीची यादी तयार होते, ती यादी उपनिबंधकाकडे जमा करणे सक्तीचे करावे. उपनिबंधकाने येणे वसुलीबाबत गृहनिर्माण संस्था काही नियम ठरविते ते तपासून बघणे हे उपनिबंधकाचे काम आहे. सदनिकेत सहकारी तत्त्वावर राहायचे म्हटले की प्रत्येक सभासदाला आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींना मुरड घालावी लागणार हे उघड आहे. पण बहुमताचा निर्णय शिरोधार्य मानला पाहिजे, जो लोकशाही संकेतातला आहे!

34 comments:

  1. प्रत्येक सदनिकेच्या संबंधात समितीकडून संस्थेचा खर्च निश्चीत करणेबाबत, सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधी ६७(ब) मध्ये, “उपविधी क्रमांक ६७(अ) मध्ये निर्धारित केलेल्या तत्वांच्या आधारावर समिती प्रत्येक सदनिकेच्या बाबतीत संस्था शुक्ल आकारणी निश्चित करील. मात्र सर्व भूगागांना जरी त्याचे क्षेत्रफळ कमी अधिक असले तरी सदरची आकारणी समप्रमाणात असेल”. माहिती : सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सदनिका’व्यतिरिक्त , तळमजल्यावर ‘गाळे-दुकाने’, ‘गार्डन फ्लट’, ‘रो-हाँउसेस’, ‘टेरेस फ्लट’, ‘ऑफिस’, खाजगी ‘मंगल कार्यालय-हॉल’ असे क्षेत्रफळ कमी अधिक असले तरी शुक्ल आकारणी समप्रमाणात करायची…. वरील सर्वांना सम शुक्ल आकारणी असेल का या बाबत माहिती देणेची विनंती.

    पी.के.शेवाळे,
    9422646894
    pralhadkshewale@gmail.com
    07/08/2018…PUNE.

    ReplyDelete
    Replies
    1. सर हमारा मेंट्नेन्स ५००० बाक़ी है ओर हमलोग हमेशा इंट्रेस्ट के साथ पैसा जब आता है तब जमा करते है ओर ये भी भरने बोले है थोड़े टाइम में तो सिक्रीटरी ने पानी बंद करने को बोला ये अधिकार या क़ायदा है इनको मैं क्या क्रू मुझे बताइए plz

      Delete
  2. समशुल्क आकारणे चुकिचे आहे. म्हणजे भुधारक अधिकचा खर्च देऊ शकत नाही.

    ReplyDelete
  3. सोसायटी आवारात मधे अडथळा निर्माण केल्यास कोणते कलम लागू होते

    ReplyDelete
  4. सोसायटी आवारात मधे अडथळा निर्माण केल्यास कोणते कलम लागू होते

    ReplyDelete
  5. सिंक्कींग फंड आणि मेंटेनन्स एकत्र काढता येत का?

    ReplyDelete
  6. माझा 400spr fit रूम आहे टैकस स्वता भरतो इतर रुम 600 sp फुट आहे टैकस स्वतन आहे मेन्टेनस समान भरावे का फुटबॉल नुसार

    ReplyDelete
  7. रुम मालक त्याची रुम विकते वेळी सोसायटीला काही रक्कम
    द्यावी लागते का??

    ReplyDelete
  8. सोसायटीच्या आवारात वैयक्तिक फुलझाडं किंवा कुंड्या लावल्यास काय कारवाई करता येईल

    ReplyDelete
  9. सोसायटीच्या सभासदांना न विचारता किंवा मिटिंग न लावता टेरेसचे कुलूप जर सेक्रेटरीने बदलले तर काय कारवाई करता येईल

    ReplyDelete
  10. सोसायटी तीन वर्षांपासून आहे पण काही फ्लॅट ची विक्री आता झाली तर सोसायटी तीन वर्षांपासून चे मेंटेनन्स बिल देते आहे तर कसे करायचे

    ReplyDelete
  11. Society madhe saman pani vatap hot nahi

    ReplyDelete
  12. हाऊसीग सोसायटी मधील गणपती मंडळ जर रजिस्टर केले नसेल तर सार्वजनिक गणपती मंडळ plat मालकाला कडुन सक्तीने गणपती वर्गणी घेऊन शकतात का.

    ReplyDelete
  13. बिल्डर ने सोसायटी लेटरहेड वर लिहून दिले असेल कि काही रक्कम बाकी नाही तरी पण सोसायटी मधील कमीटी त्रास देत असेल तर काय करावे

    ReplyDelete
    Replies
    1. निबंधकाकडे दाद मागावी

      Delete
  14. सोसायटी तील मोठ्या दुरुस्तीकरण्या साठी अंदाजीत खर्च काढण्या साठी एकच निविदा मागवून अंदाजित खर्च काढता येतो का?

    ReplyDelete
  15. थकबाकी दारास मतदानाचा आणि पदाधिकारी निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असतो का?

    ReplyDelete
  16. Sanstha nil zale tar nave karnacha marg konta

    ReplyDelete
  17. आमच्या सोसायटी मध्ये एका सभासदाचा दि.21/1/2020 ला मृत्यू झाला सदर सभासदाने मृत्यू पूर्वी म्हणजेच त्याची रूम विकली दि 7/1/2020 ला रजिस्ट्रेशन केले याबाबत त्यांनी सोसायटी ला कुठलीही कल्पना दिली नाही. त्यांचेकडे सोसायटीचा दहा वर्षापासून चा मेन्त्ट्नेस थकीत आहे. तर त्यावर व्याज कश्याप्रकारे आकारावे. तसेच सभासदाचा दि.21/1/2020 ला मृत्यू झाला असल्याने मेंटनेस कश्याप्रकारे वसूल करावा. सदर सभासदाने नामनिर्देशन ही केलेले नाही. त्यांच्या मोठ्या मुलाने संस्थेला अर्ज केला की आमच्या परवानगी शिवाय रूम मध्ये कोणालाही जाण्यास परवानगी देऊ नये. परंतु सदरचा रूम तर विकला आहे. यावर काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  18. वरच्या मजल्यावरील पाणी गळतीमुळे जर त्याच्याखालील मजल्याची सिलिंग खराब होत असेल तर काय करावे? त्याचबरोबर मेंटेनन्स आकारणी बाबत काही मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. गृहनिर्माण संस्था असेल तर संस्थेची मंजूर उपविधी मधील नियम 67,68,69 बघावे ,सविस्तर आहे,
      गळती बद्दल water profing करायला वरचा व खालचा सभासदाला सामायिक खर्चातून सांगावे, आप आपसातील समजुतीने कामकाज करून घ्यावे

      Delete
  19. सोसायटी मेंटेनन्स कश्यावरुन आकारतात प्रति चौरस फूट अथवा कसे?

    ReplyDelete
    Replies
    1. समान दर आकारणी पद्धतीने

      Delete
  20. सोसायटी फार्म करतांना जर कोणी त्यास त्यांचे वाट्याची आवश्यक खर्च रक्कम द्यावयास तयार नसेल तर त्यावर काय कार्यवाही करता येईल किंवा खर्च रकम वसूल करावी मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  21. जर एखादया सोसायटी मधील सेक्रेटरी नियमाला धरून काम करत नसेल गुंडगिरी ची भाषा करत
    असेल तर काही कारवाई करता येते का

    ReplyDelete
  22. सोसायटी मध्ये एकदा सभासद प्रत्येक गोष्टीत अरेरावी करत असेल व सोसायटी ने केले ले नियम पळत नसेल तर त्याच्यावर के कार्यवाही होउ शकते

    ReplyDelete
  23. सोसायटी मध्ये एकदा सभासद प्रत्येक गोष्टीत अरेरावी करत असेल व सोसायटी ने केले ले नियम पळत नसेल तर त्याच्यावर के कार्यवाही होउ शकते

    ReplyDelete
  24. आम्ही सहयोगी सिनिअर सिटीझन आहोत लिफ्ट करता बहिणीची सही आवश्यक असते का ती नसल्यास काय करावे लागेल

    ReplyDelete
  25. सोसायटीच्या सदस्यांनी मेंटेंनस थकलेला असेल तर काय कारवाई होते

    ReplyDelete
  26. सोसायटीच्या सदस्यांनी मेंटेंनस थकलेला असेल तर काय कारवाई होते

    ReplyDelete
  27. I am staying on 5th floor. The 4th floor owener does the harrassment for
    I do the yoga at 8am everyday by plying a CD on a very low volume but the 4th floor tenant who is a SUB TENANT Ccomplaints me saying that there grown up children are slipping (8am) & they r getting disturb.
    2) we had a guest for a day. There baby girl who is 1year & 4months was crying at 10.25 pm not even for a minute but immediately the sub tenant phone me up saying that they r getting disturb because of BABY CRYING.
    MY Monther in Law who is 83 years old & having not even 45 kg of Weight was walking in the living room as she can not go dawn because of KARONA,but the sub tenant complints to me that they r getting disturb because the noise made by my Mother in Law while walking.
    There r N nosof complints like this. Pl advise me How to address these complints
    REGARDAS

    ReplyDelete
  28. एखादा मेंबर त्याची थकबाकी अर्धवट भरतो तेंव्हा लावलेले व्याज आधी घ्यायचे का? त्याचे calculation कसे करायचे? कोणत्या महिन्यापासून त्याने maintenance भरला असे गृहीत धरायचे?

    ReplyDelete